आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हयातील दोन ठिकाणावरून 15 लाख रुपये किंमतीचे दोन मांडूळ जातीचे साप जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली6 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील देऊळगाव जहाँगिर व सरकळी येथे दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. १९ छापे टाकून १५ लाख रुपये किंमतीचे दोन मांडूळ जातीचे साप जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन वन विभागाच्या हवाली करण्यात आले आहेत. तस्करीच्या उद्देशाने हे मांडूळ बाळगण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

हिंगोली जिल्हयातील देऊळगाव जहाँगिर येथे सतीष कांबळे याने मांडूळ जातीचा साप तस्करीच्या उद्देशाने बाळगला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, राजूसिंह ठाकूर, शंकर ठेंबरे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने देऊळगाव जहांगिर येथे जाऊन सतीष कांबळे याच्या घरावर छापा टाकला. त्या ठिकाणी २ किलो वजनाचा ३ फुट लांबीचा मांडूळ आढळून आला. या मांडूळाची किंमत १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सरकळी येथे दत्तराव साठे याच्या घरावर छापा टाकून त्याच्या घरातून १ किलो वजनाचा ३ फुट लांब मांडूळ जप्त केला आहे. या मांडूळाची किंमत ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी वरील दोघांनाही मांडूळासह वन विभागाच्या हवाली केले आहे. दोघांनीही तस्करीच्या उद्देशाने हे मांडूळ बाळगल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...