आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल पॉझिटिव्ह:गोवरच्या दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, भिवंडीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील एक आणि सिल्लोड येथील एक संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मनपाने संशयित गोवर रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी मुंबई येथील हाफकिन प्रयाेगशाळेत पाठवले हाेते. दोन दिवसांपूर्वीच शताब्दीनगर आणि रहमानिया कॉलनीत आठ संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेतले हाेते.

त्यातील सातवर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वीच या मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले हाेते. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. प्रत्येक संशयित गोवर रुग्णाला जीवनसत्त्व अचे दोन डोस दिले जात आहेत. ज्या बालकांचे लसीकरण राहिलेले आहे, त्यांना गोवरची लस दिली जात आहे. ज्या मुलांना ताप आणि अंगावर पुरळ असतील त्यांना लगेच रुग्णालयात दाखवा, असे आवाहन मनपाचे आराेग्य अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...