आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवरच्या साथीचा जिल्ह्यात शिरकाव:पाटोदा तालुक्यात गोवरचे दोन संशयित; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात आढळणाऱ्या गोवरच्या साथीचा जिल्ह्यात शिरकाव होण्याची चिन्हे आहेत. पाटोदा तालुक्यात दोन संशयित बालक रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. गोवर हा विषाणूपासून होणारा आजार असून, रुग्णाच्या खोकल्याद्वारे पसरतो, त्यामुळे गोवर, रुबेला ही लस बाळाला देणे आवश्यक आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळतात.

हा आजार संसर्गजन्य ^गोवर संसर्गजन्य आजार आहे. पालकांनी बालकांची योग्य ती काळजी घ्यावी. दोन संशयित आहेत, मात्र त्यांना गंभीर लक्षणे नाहीत. आरोग्य विभाग जागृती करत आहे . - डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा

बातम्या आणखी आहेत...