आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात व्यक्तीने अपहरण:दोन परप्रांतीय कामगारांना 4 दिवसांपासून डांबून ठेवले

वाळूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूळ उत्तर प्रदेश येथील दोन कामगार मागील चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी केली आहे. मात्र, आपल्या नातेवाइकांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करत त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. रामप्रकाश प्यारेलाल (३५) व लल्ला राजमणी (२८, दोघेही रा. साजापूर) अशी त्या कामगारांची नावे आहेत.

मूळ उत्तर प्रदेशातील डिहरिया येथील रामप्रकाश व लब्बा या दोघांना त्यांचा नातेवाईक सुनीलकुमार रजनीश याने कामानिमित्त ६ महिन्यांपूर्वी वाळूज औद्योगिक परिसरात बोलावून घेतले. दोघेही एका खासगी कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते.

बेपत्ता की अपहरण?
१० डिसेंबर रोजी सुनीलकुमारला समद निजाम शेख यांचा फोन आला. तुझे दोन्ही नातेवाईक ९ डिसेंबर रोजी कंपनीत गेले ते अद्यापही परत आले नाहीत, असे सांगितले. नंतर सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा शोध लागत नसल्याने अखेर सुनीलकुमारने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मात्र, पोलिसांनी अपहरणाऐवजी बेपत्ता झाल्याचीच नोंद केली.

बातम्या आणखी आहेत...