आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Finally, After Two Months, The Maharashtra Kesari Winner Wrestler Got The Prize, But It Was Not The Organizers But The Manas Bhosle Family Who Gave The Prize.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा:अखेर दोन महिन्यानंतर विजेत्या पहिलवानाला मिळाले बक्षीस, आयोजकांनी नव्हे तर भोसले घराण्याकडून गौरव

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या पहिलवानाला अखेर दोन महिन्यानंतर बक्षीस मिळाले असून, त्यांचा आयोजकांनी नव्हे तर भोसले घराण्याने गौरव केला.

महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राच्या मातीतील मानाच्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मूळ सोलापूरच्या विशाल बनकरला पराभूत करत 2 एप्रिल रोजी मानाची गदा पटकावली होती. जवळपास 21 वर्षानंतर त्यांने कोल्हापूरला ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवून दिला. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला बक्षिसाची रक्कम मिळाली नाही, अशी खंत पृथ्वीराजने तेव्हा सोशल मीडियावर व्यक्त केली होती. ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक नेत्यांनी लाखो रुपये बक्षीस पृथ्वीराजला जाहीर केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि तालीम संघाने महाराष्ट्र केसरी विजेत्याला फक्त चांदीची गदा दिली होती, मात्र रोख रक्कम दिली नव्हती. अखेर दोन महिन्यानंतर छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला रॉयल एनफिल्ड बुलेट गाडी आणि उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकरला होंडा युनिकाँन गाडी देऊन गुरुवारी जलमंदिर पॅलेस जिल्हा सातारा येथे गौरवण्यात आले.

तिघांना प्रत्येकी 51 हजार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वजन गटातील विजेते मल्ल गणेश कुंकुले, आकाश माने आणि सुमित गुजर यांना प्रत्येकी 51 हजार रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या सत्कार समारंभास डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील पैलवान मंडळी, कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

राजाश्रयाचा शब्द

छत्रपती शिवरायांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता. या परंपरेचे अनुकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील. महाराष्ट्रातील सर्व पहिलवान मंडळीच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर राहण्याचे वचन देतो, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...