आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:दोन अट्टल चोरटे गुन्हे शाखेच्या ताब्यात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

दुकानफोडी, घरफोड्यांसह बिअर शॉपी फोडून रोख रक्कम लांबवलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. बबन ऊर्फ गबऱ्या भागाजी मकळे (३५, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी) असे बिअर शॉपी फोडणाऱ्याचे, तर अक्षय ऊर्फ भैया रमेश वाहुळ (२०, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) असे खुलताबादेत चोरी करणाऱ्यांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोतील बिअर शॉपी फोडून रोख रक्कम लांबवली होती. या वेळी सीसीटीव्हीत कैद झालेला बबन ऊर्फ गबऱ्या मनपाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला गुरुवारी पकडले. त्या वेळी त्याने साथीदारासह बिअर शॉपी फोडून चोरलेले पैसे आपसात वाटून घेतल्याची कबुली दिली. त्याच्यावर मुकुंदवाडी, जवाहरनगर, सिडको, सातारा, पुंडलिकनगर, उस्मानपुरा, क्रांती चौक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र हिसकावल्याचे गुन्हे दाखल आहेत. अक्षय वाहूळने वेरूळ येथील राजवाडा भागात साथीदाराच्या मदतीने घर फोडून रोख व दागिने असा २८ हजारांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली. अक्षय कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूरचा मेहुणा आहे. त्याला सातारा परिसरातून पकडले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके, रमाकांत पटारे, शेख हबीब, अजहर कुरेशी, विजय निकम, राजेंद्र साळुंके, नितीन देशमुख व संदीप सानप यांच्या पथकाने केली. अक्षयला खुलताबाद पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...