आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगर दोन वेगवेगळ्या घटनांत रविवारी दोघांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या करत आयुष्य संपवले. यात पहिली घटना टाकळी शिवार, तर दुसरी शिवाजीनगरात घडली.
गारखेड्यातील रामकृष्णनगरचे रहिवासी किशोर यशवंत पवार (४२) हे मोंढा नाका येथील व्यावसायिकाकडे वरिष्ठ लेखापाल होते.
नक्की झाले काय?
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलाला सोडून ते पुढे गेले. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी घरी गेलेच नाही. मुलाने त्यांना वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाइल बंद होता. कुटुंबाने घाबरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, रात्री त्यांनी वरुड काजीजवळील टाकळी शिवारात रेल्वे येताच रुळावर झोपून आत्महत्या केली.
घटनेची माहिती नागरिकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांच्याकडील कागदपत्रांवरून कुटुंबाशी संपर्क साधला. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस तपास करीत आहेत.
तणावातून उचलले टोकाचे पाऊल
दुसऱ्या घटनेत शिवाजीनगरचे रहिवासी भगवान विठ्ठल शिंदे ( ४७) यांनीही जीवन संपवले. भगवान ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. काही दिवसांपासून आजारी असल्याने ते सतत तणावात असायचे. शनिवारी रात्री शिवाजीनगर रेल्वे रुळावर त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.