आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यदिनी उपोषण:पाणी योजनेसाठी 12 मीटरचे दोन पाइप दाखल ; अडीचशे रहिवाशांचे निवेदन

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावसिंगपुरा, ग्लोरिया सिटी, कासंबरी दर्गा वसाहत, निसर्ग कॉलनी, अहिंसानगर, बोधीनगर, लाल माती, पेठेनगर, अन्सार कॉलनी, केटी हाइट, भावसिंगपुरा परिसरातील रहिवासी पडेगाव येथील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया युनिटच्या उग्र वासामुळे त्रस्त आहेत. हा प्रकल्प त्वरित बंद करा, अशी मागणी रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यासाठी अडीचशे लाेकांनी १५ आॅगस्ट राेजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ग्लोरिया सिटी सोसायटीजवळ प्राण्यांची स्मशानभूमी उभारणीचे काम नव्याने सुरू आहे. हे कामदेखील नियमबाह्य असून याच त्रास नागरिकांना होणार आहे. त्यामुळे हे कामही थांबवावे. पडेगावातील कचरा प्रकल्प बंद करावा. यावर १४ ऑगस्टपर्यंत कारवाई न झाल्यास १५ आॅगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रामराव दाभाडे, शकील मेहमूद कुरेशी, वसंत धवसे, प्रकाश अहिरे, अली शेरखान, शेख अन्वर, गणेश बोडरे, प्रसाद तायडे, किशोर सातपुते आदींनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...