आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी:कोविड सेंटरमधून पलायन केलेले दोन कैदी ताब्यात, हिंगोली व नांदेड जिल्हात केली कारवाई, एक फरारच

परभणी3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रविण देशपांडे
  • कॉपी लिंक

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून मंगळवारी (ता.1) पहाटेच्या सुमारास फरार झालेल्या तीन अट्टल गुन्हेगारांपैकी दोघाना हिंगोली व नांदेड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून बुधवारी ताब्यात घेण्यात आले .

दिनांक 22 ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी हे कोरना बाधित झाले होते त्यापैकी 19 कैद्यांना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तिघांनी मंगळवारी भल्या पहाटे खिडकीचे गज कापून पलायन केले होते. त्यांच्या शोधार्थ नानलपेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले होते. या पथकाने दोन आरोपींना बुधवारी (दि. दोन) ताब्यात घेतले. सरदार अमेरजित सिंग सरदार सेवक सिंग (वय 40)या आरोपीस भोकर शिवारात भोसी येथून तर नागनाथ उर्फ विकास उर्फ नागनाथ किरण गोविन्दपुरे यासही पारडा (जि.हिंगोली) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांव्यतिरिक्त तिसरा कैदी हा परभणीतील काद्राबाद प्लॉट परिसरातील रहिवासी असून त्याचे नाव प्रभाकर उर्फ राणा शिवाजी पैठणे (वय 63) असे आहे तो मात्र अद्याप हाती लागला नाही.

जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरीक्त पोलिस अधीक्षक आर. रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.