आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळमधून मागवले पाईप:नवीन पाणीपुरवठा योजनेचे दोन रेडीमेड पाईप अखेर शहरात, पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती मिळणार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची नवीन पाणी पुरवठा योजना गतीने पूर्णव्हावी या करीता ठेकदार कंपनीने तयार पाईप मागवावे असे आदेश शासनाने दिले होते. त्या नुसार 2500 मीमीचे पाईप खरेदी सुरु झाली असून दोन पाईप कामाच्या ठिकाणी पोहचले आहेत. भोपाळमधील वेलसंन्स कंपनीने 2500 मिमी व्यासाचे पाईप पाठविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी दोन पाईप कामाच्या ठिकाणी पोहचल्यामुळे पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती मिळणार आहे. अशी माहिती एमजेपीचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी दिली.

तीन वर्षांपूर्वी शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूरी करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत योजनेचे काम सुरु करण्यात आले असून या कामासाठी हैदराबाद येथील जिव्हीपीआर कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली आहे. जीव्हीपीआर कंपनीने नक्षत्रवाडी येथे पाईप निर्मितीचा कारखाना सुरू केला आहे. परंतु, कारखान्यात पाईप निर्मितीला उशीर लागत असल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कामाची गती वाढविण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिले. त्यानुसार केंद्रेकर यांनी कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधीना बाहेरुन पाईप खरेदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जीव्हीपीआर कंपनीने भोपाळ आणि भुज येथील वेलसंन्स आणि जिंदल कंपनीकडून पाईप खरेदीचा निर्णय घेतला. साडेसहा किमीचे पाईप खरेदी केले जाणार आहे.

दीड महिन्यानंतर जीव्हीपीआर कंपनीने भोपाळ येथील वेलन्संस कंपनीकडून पाईप खरेदी करुन आणण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी पाईप घेऊन ट्रक नियोजीत पाईपलाईन टाकण्याच्या ठिकाणी दाखल झाले. 2500 मिमी व्यासाचे 12 मिटरचे पाईप आले असून संत एकनाथ कारखान्यासमोर पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्याकरिता एक किमीचे ट्रेंच खोदण्यात आला आहे. या ट्रेंचमध्ये पाईप टाकले जाणार आहे. कंपनीने निर्मित केलेले पाईप आणि खरेदी केलेले पाईप मिळून पाईपलाईनच्या कामाला गती मिळणार असल्याचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...