आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:दोन रिक्षाचालकांना तीन जणांकडून मारहाण ; मुकुंदवाडीत धिंगाणा, एकाची रिक्षा पळवली

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन जणांच्या टोळीने तीन तासांत दोन रिक्षाचालकांना मारहाण करत एकाची रिक्षा पळवली. शुक्रवारी रात्री काही अंतराने मुकुंदवाडी व विश्रांतीनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

असलम गुलजार पठाण (२८) हे १७ जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास विश्रांतीनगरमधून जात होते. त्यावेळेस तिघांनी त्यांना थांबवून पुंडलीकनगर येथे सोडण्याची मागणी केली. असलम देवळाई चौकाकडे जात असल्याने त्यांनी भाडा घेण्यास नकार दिला. मात्र, नकार देताच तिघांनी त्यांना मारहाण करून मांडीत धारधार शस्त्राने वार केले. टोळक्यामधून एकाचे नाव शेख इरफान शेख लाल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या तिघांच्या टोळीने एवढ्यावरच न थांबता १८ जून रोजी पावणेएक वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरात धिंगाणा घालायला सुरूवात केली. तसेच तेथील दीपाली हॉटेल समोर गणेश वखरे रिक्षा घेऊन उभे असताना तिघांनी पुन्हा पुंडलिकनगर येथे सोडण्याची मागणी केली. मात्र, मी, येथे बहिणीची वाट पाहत थांबलो आहे, असे सांगितल्यानंतर तिघांनी त्यांना मारहाण करत रिक्षात बसवले. त्यानंतर न्यायनगर येथे नेऊन पुन्हा मारहाण करत त्यांची रिक्षा (एमएच २० ईके ०५५३) पळवून घेऊन गेले. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...