आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खदायक:दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, दरकवाडी येथे घडली घटना

करमाड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरकवाडी(ता. औरंगाबाद) येथील दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. पार्थ धनंजय वाघ (११) व अजिंक्य धनंजय वाघ (९,रा. दरकवाडी, ता. औरंगाबाद) अशी मृत मुलांची नावे आहेत.

शेतकरी धनंजय वाघ (रा. दरकवाडी, ता. औरंगाबाद) यांची दरकवाडी शिवारात शेती आहे. त्यांना दोन मुले होती. याच ठिकाणी ते कुटुंबीयांसोबत राहतात. सोमवारी (५ सप्टेंबर) ते कामानिमित्त करमाड येथे आले होते, तर पार्थ व अजिंक्य शाळेत गेले होते. ते करमाड येथून काम आटोपून दरकवाडी येथील शेतात आले असता, त्यांना दोन्ही मुले दिसली नाहीत. या वेळी त्यांनी जवळच असलेल्या लोकांना सोबत घेऊन मुलाचा शोध घेतला असता, त्यांना शेततळ्यात दोन्ही मुले बुडाली असल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्यांनी सोबतच्या नागरिकांच्या मदतीने मुलांना शेततळ्यातून बाहेर काढले असता दोघेही मृत झाले होते. पार्थ पाचव्या वर्गात, तर अजिंक्य चौथ्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. करमाड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

बातम्या आणखी आहेत...