आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:प्रत्येक गटातील दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गट ए : कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड नेदरलँड युवा खेळाडूंनी भरलेला आहे. त्यांच्याकडे डिफेंडर व्हॅन डायक व फॉरवर्ड डेपेसारखे स्टार आहेत. सेनेगलला डार्क हॉर्स म्हणतात. घरच्या मैदानाचा फायदा कतारला मिळेल. अंदाज: नेदरलँड आणि सेनेगल. {गट बी : इंग्लंड, इराण, वेल्स, अमेरिका अमेरिका सर्वात तरुण संघ आहे. इंग्लंडचा अनुभवी हॅरी केन आणि तरुण बेलिंगहॅम इराण हा आशियातील सर्वोत्तम संघ आहे. वेल्समध्ये गॅरेथ बेल आणि रॅमसेसारखे तारे आहेत. अंदाज: इंग्लंड आणि अमेरिका. { गट सी : अर्जेंटिना, सौदी, मेक्सिको, पोलंड अर्जेंटिना सलग ३५ सामन्यांत अजेय आहे. स्टार गुइलेरमोच्या नेतृत्वाखाली मेक्सिकोने विश्वचषक गाठला आहे. पोलंड जागतिक दर्जाचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवानडोस्कीच्या उपस्थितीत आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे. अंदाज: अर्जेंटिना आणि मेक्सिको. {गट डी : फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, ट्युनिशिया, डेन्मार्क गतविजेत्या फ्रान्सकडे स्टार खेळाडूंचा भरणार आहे. ऑस्ट्रेलिया अनुभवी दिग्गजांनी भरलेला आहे. एरिक्सन डेन्मार्कला पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. अंदाजः फ्रान्स आणि डेन्मार्क. {गट ई: स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान २०१० चा चॅम्पियन स्पेन दावेदार असू शकतो. त्याचबरोबर कोस्टा रिकाला गोलरक्षक केलोर नवासच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करेल. म्युलरच्या नेतृत्वाखाली जर्मन संघाला मागील कामगिरीत सुधारणा करेल. अंदाज ः स्पेन आणि जर्मनी. {गट एफ : बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया मॉड्रिचच्या नेतृत्वाखाली उपविजेता संघ मागील कामगिरीची पुनरावृत्ती करू पाहिल. क्रमांक-२ बेल्जियमचा सुवर्णकाळ सुरू आहे. कॅनडा आणि मोरोक्को हे अंडरडॉग असल्याचे सिद्ध होऊ शकतात. अंदाज: बेल्जियम आणि क्रोएशिया. {ग्रुप जी: ब्राझील, कॅमेरून, सर्बिया, स्वित्झर्लंड नेमार व व्हिनिसियससारखे स्टार ब्राझीलला विजयापर्यंत नेतील. स्वित्झर्लंडने फ्रान्सला युरो २०२० मधून बाहेर काढले. कॅमेरूनने पात्र होण्यासाठी खूप संघर्ष केला. अंदाज: ब्राझील आणि स्वित्झर्लंड. {गट एच : पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, द. कोरिया गटातील सर्वात मोठे आकर्षण उरुग्वे व घाना यांच्यातील लढत असेल. रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगाल खूप मजबूत आहे. कोरियाचे सोन मिनवर यश अवलंबून आहे. अंदाजः पोर्तुगाल आणि उरुग्वे.

बातम्या आणखी आहेत...