आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात एकच केंद्र:दोन हजार विद्यार्थी आज देणार जेईई अॅडव्हान्स ; आधी पोहोचले तरच मिळू शकेल प्रवेश

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी प्रवेशासाठी महत्त्वाचा टप्पा असलेली जेईई अॅडव्हान्स परीक्षा २८ ऑगस्ट रोजी देशभरातील २१५ शहरांमध्ये होत आहे. औरंगाबादेत सुमारे २ हजारहून अधिक विद्यार्थी चिकलठाणा येथील आयऑन डिजिटल झोन या केंद्रावर ही परीक्षा देतील. त्यासाठी सकाळी ९ ते १२ व दुपारी २.३० ते ५.३० अशा दोन बॅचचे नियोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेतील तज्ज्ञ अमित आहुजा यांनी सांगितले की, या वर्षी तीन पानी हॉलतिकीट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. पहिल्या पानावर विद्यार्थ्याचे ओळखपत्र, इतर माहिती व परीक्षेसंबंधी सूचनांचा समावेश आहे. याच पानावरील दिशानिर्देशांसोबत देण्यात आलेल्या डिक्लेरेशनवर विद्यार्थ्यांना स्वत:ची तसेच आपल्या पालकांची स्वाक्षरी घ्यावी लागेल. त्यानंतर जेईई अॅडव्हान्स पेपर २ सुरु होण्यापूर्वी हे प्रवेशपत्र पर्यवेक्षकांकडे जमा करावे लागेल. या वर्षी हॉलतिकिटावर विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग वेळ देण्यात आलेला नाही. पेपर १ ची सुरुवात ९ वाजता होणार असली तरी विद्यार्थ्यांना त्यापूर्वी दोन तास केंद्रावर बोलावण्यात आले आहे. कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट सोबत आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियोजित वेळेपेक्षा १ तास जास्त वेळ
हॉलतिकिटावर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांना लिहिण्यात काही शारीरिक अडचणी आहेत, त्यांना परीक्षा केंद्रावर लेखनिकाची मदत केली जाणार आहे. हा लेखनिक ११ वी मॅथचा विद्यार्थी असेल. लेखनिकाची निवड पॅनल करतील. दिव्यांगांना नियोजित वेळेपेक्षा १ तास जास्त वेळ दिला जाईल. लेखनिक मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी केंद्रावर संपर्क साधून तशी मागणी करावी लागेल.

या सूचनांकडे लक्ष द्या : परीक्षेला येताना सोबत ओळखपत्र हवे
{ परीक्षेसाठी येताना हॉलतिकिटासोबच आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड यासारखे राष्ट्रीय ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक
{ परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धा तास आधी कॉम्प्युटर सिस्टिम परीक्षार्थीला देणार.
{ त्यावर विद्यार्थ्याचे नाव, फोटो व जेईई अॅडव्हान्सचा रोल नंबर टाकलेला असेल.
{ रोल नंबर तसेच स्वत:ची जन्मतारीख पासवर्ड म्हणून टाकून लॉगइन करावे लागेल.
{ परीक्षा सुरु होण्यापूर्वी २५ मिनिटे आधी परीक्षेबाबतच्या सूचना दिल्या जातील. त्याचे पालन करावे.

बातम्या आणखी आहेत...