आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अजिंठा घाटात दोन ट्रक-दोन लोडिंग रिक्षांचा अपघात; आठ जण जखमी, चार तास वाहतूक ठप्प

फर्दापूर / शरद दामाेदर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा घाटात दोन ट्रक व दोन लोडिंग रिक्षांचा भीषण अपघात होऊन आठ जण जखमी झाले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातामुळे घाटात चार तास वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सकाळच्या सुमारास अमरावतीवरून ट्रक (एमएच-४० एके ५१५६) हा सोयाबीन घेऊन जळगावकडे जात होता. अजिंठा घाटात आल्यावर ट्रकचे ब्रेक निकामी झाले व समोरील लोडिंग रिक्षा (एमएच २१. ८६९४) व रिक्षा (एमएच १९ सीवाय ४८२३) हे वाकोद (ता. जामनेर) येथील बाजाराला जात असताना मागून जोराची धडक दिली. यामुळे दोन्ही लोडिंग रिक्षा डोंगराला धडकल्या व ट्रकखाली दाबल्या गेल्या. यात दोन्ही चालक व सोबत बसलेले दोघे असे चार जण दाबल्या गेले. समोरून येणारा ट्रक (जीजे २६ टी ६७६१) हा गुजरातवरून केमिकल पावडर घेऊन हैदराबादला जात होता. त्यालाही ट्रकने जोराची धडक दिली.

यात चालक व त्याच्या सोबत असलेले क्लीनर जखमी झाले. या अपघातात औरंगाबादवरून लोडिंग रिक्षा घेऊन येणारा चालक शेख जावेद हा रिक्षात दाबला गेला होता. त्याला एक तास प्रयत्न करून बाहेर काढन्यात आले. या अपघातात मधुर सासा, सचिन दसरे, (दोघे रा. नांदेड), शेख जावेद, सय्यद मोईन (दोघे रा. औरंगाबाद) विनोद गुजर, प्रवीण गुजर (दोघे रा. शेंद्रुनी, ता. जामनेर), सचिन ठाकरे, दीपक गावीत, (दोघे रा. देवगाव, ता. पारोळा) हे जखमी झाले. यातील मधुर सासा व शेख जावेद यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दीड महिन्यात चौथ्यांदा काेंडी
१ आक्टोबरला वाहतूक ठप्प होऊन रुग्णवाहिका अडकली होती. ७ आॅक्टोबर रोजी ७ तास वाहतूक ठप्प होती. २३ आॅक्टोबर रोजी ३० तास घाटात वाहतूक ठप्प होता. ६ सप्टेंबरला वाहतूक ठप्प झाली होती. महिनाभरात चार वेळेस घाटात वाहतूक ठप्प झाली.

साडेचार किमीचा घाट
अजिंठा घाटात काम चालू असलेल्या ठिकाणी केदारेश्वर कंपनीने दिशा फलकही लावलेले नाही. हे काम अतिषय धिम्या गतीने सुरू आहे. हा घाट साडेचार किमीचा आहे.

बातम्या आणखी आहेत...