आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकाचा अपघात:दौलताबाद घाटात दुचाकीला अपघात; एक ठार, एक जखमी ; दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले

दौलताबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौलताबाद घाटात दुचाकीच्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजता घडली. नारायण गणेश चव्हाण (रा. गदाना) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

नारायण व गणेश गजहरी चव्हाण (२२) हे दुचाकीने (एमएच २० एफडब्लू ७१७७) हे गदाना गावातून वाळूज येथे कंपनीत कामासाठी जात होते. दौलताबाद घाटातील वळणावर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले.

दोघांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना नारायणचा मृत्यू झाला. त्याचे वडील शेतकरी आहेत. घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...