आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:भरधाव ट्रकची दुचाकीस जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • घटनास्थळी रक्त, मांसाचा पडलेला सडा या अपघाताची भीषणता दर्शवीत होता

वारंगाफाटा ते हदगाव मार्गावरील वारंगाफाटा वळण रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुंचा (ता.कळमनुरी) येथील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. ३०) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील तुकारा राघोजी काळे (५५), रावसाहेब गणपतराव लोमटे (५५) हे दोघे एका दुचाकी वाहनावर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चुंचा येथून वारंगाकडे निघाले होते. यावेळी त्यांचे वाहन वारंगा येथील वळण रस्त्यावर आले असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी रक्त, मांसाचा पडलेला सडा या अपघाताची भीषणता दर्शवीत होता. या अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पलायन केले.

या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठा जमाव एकत्र आला होता. पोलिसांनी जमाव आक्रमक होण्यापुर्वीच त्यांना शांत केले. त्यानंतर ट्रक चालकाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सायंकाळी उशीरा पर्यंत आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser