आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर-धुळे महामार्गावर वेरूळ-माटेगाव चौफुलीवर ट्रकने मोटारसायकलला हुलकावणी दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली महिला ट्रकच्या टायरखाली चिरडून जागीच ठार झाली. माया बाबासाहेब ढिवरे (३६, रा. वेरूळ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून अपघाताची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. वेरूळ येथील रहिवासी माया ढिवरे ही महिला मोटारसायकलवर (एमएच २० सीबी ७८६०) पाठीमागे बसून वेरूळ-माटेगाव चौफुली ओलांडून वेरूळकडे येत हाेती. त्याच वेळी ट्रकने (केए ५६, १४५१) मोटारसायकलला हुलकावणी दिली.
या हुलकावणीत माया ढिवरे मोटारसायकलवरून थेट ट्रकच्या पाठीमागच्या टायरखाली येऊन चिरडली गेली. हा अपघात इतका भयानक होता की महिलेचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. अपघात होताच वेरूळचे ग्रामपंचायत सदस्य शेख मासियोद्दीन आणि त्यांचे सहकारी यांनी मदत करून ॲम्ब्युलन्सने शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवले होते.
अपघाताची माहिती मिळताच वेरूळचे पोलिस पाटील रमेश ढिवरे यांनी तत्काळ खुलताबाद पोलिसांना कळवले. पोलिस जमादार रितेश आव्हाड आणि विनोद बिघोत यांनी घ ट्रॅफिक सुरळीत करून अपघाताचा पंचनामा केला.
म्हणून हाेतात अपघात
सोलापूर-धुळे महामार्गाचा झालेला उड्डाणपूल चुकीचा तयार करण्यात आला आहे. याची चौकशी प्रत्यक्ष विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी वेरूळचे ग्रामस्थ करत आहेत. हा उड्डाणपूल वेरूळ-माटेगाव चौफुलीच्या ठिकाणी आवश्यक होता. या चौफुलीवर उड्डाणपूलाची खूप गरज आहे. येथे उड्डाणपूल व्हावा.
शहरातील वैजापूर-येवला रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २० वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजता जीवनश्री वसाहतीजवळ घडली. सुशील राजेंद्र चव्हाण (२०, रा. धरणग्रस्तनगर, वैजापूर) असे या अपघातातील मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सुशील हा येवला रोडने दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला भरधाव स्विफ्ट कारने जोराची धडक दिली. सुशीलला गंभीर दुखापत झाली. त्याला उपस्थित नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे उपचारांसाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.