आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक; पेट्रोल भरून घरी निघालेला दुचाकीस्वार अपघातात ठार

वाळूज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल भरून घराकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात सुभाष नाना आर्या (३५, रा. सिडको, वाळूज महानगर) याचा जागीच मृत्यू झाला, तर भोला गोपाल सिंगोरिया (३३) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११.३० वाजता तिसगाव चौक परिसरात घडला. सुभाष व भोला हे एकाच ठिकाणी बांधकामावर काम करत होते. बुधवारी रात्री ते मुंबई-नागपूर महामार्गावरील पंपावर पेट्रोल भरून सिडकोतील घराकडे निघाले. तेव्हा तिसगाव चौक परिसरात उड्डाणपुलालगत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यात सुभाष वाहनाच्या चाकाखाली सापडला. डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला, तर भोला बेशुद्ध पडला.

याचदरम्यान तिसगाव येथील प्रेम जाधव हे मित्रांसोबत घरी निघाले होते. त्यांनी अपघात पाहून घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिस घटनास्थळी आले. तोपर्यंत सुभाष व भोलाचे नातेवाईकही पोहोचले होते. अजय आर्या व मुकेश दुडवे यांच्या मदतीने दोघांना घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सुभाषला मृत घोषित केले. गंभीर जखमी भोलावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...