आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचोराच्या पाच दुचाकींसह सराईत गुन्हेगाराला वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याला गंगापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.
पोलिसी खाक्या दाखवताच...
याबाबत अधिक माहिती अशी की, गुप्त बातमीदाराने पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांना एक दुचाकी चोर हा चोरीची दुचाकी वापरत असल्याची खात्रीलायक माहिती दोन दिवसांपूर्वी दिली होती. सदरील माहितीची खात्री केल्यानंतर डीबी पथकाचे फौजदार चेतन ओगले, पोलिस कर्मचारी अविनाश ढगे, बाळू लहरे, राजाभाऊ कोल्हे आदींच्या पथकाने 8 जून रोजी रात्री सापळा रचून जोगेश्वरी येथून चोरीच्या दुचाकीसह आरोपी प्रकाश अवचितराव खेडेकर (वय 35 वर्ष रा. मूळगाव जाफराबाद ता. जाफराबाद जि. जालना, ह. मु. आंबेडकरनगर जोगेश्वरी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरील दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली.
8 महिन्यापूर्वी चोरी
पंढरपूर येथून मागील 8 महिन्यापूर्वी चोरलेली सदरील दुचाकी व त्यासोबतच त्याच्या घरात आढळून आलेल्या चोरीच्या इतर चार दुचाकी आशा ऐकून पाच दुचाकीसह त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला 9 जून रोजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश गंगापूर न्यायालयाने दिल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वाव्हळे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.