आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:हिंगोली ते औंढा मार्गावर भरधाव जीपने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने हिंगोलीच्या दोन तरुणांचा मृत्यू

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर नर्सी टी पॉईंट जवळ भरधाव जीप व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुभम कलकोटी (२५), रोहन शर्मा (२०, दोघे रा. हिंगोली) अशी मयत झालेल्या तरुणांची नांवे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील शुभम कलकोटी व रोहन शर्मा हे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोलीकडून औंढा नागनाथरोडकडे जात होते. त्यांचे दुचाकी वाहन नर्सी टी पॉईंटजवळ आले असतांना समोरील जीपला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकी पुढे नेली, मात्र समोरून अचानक वाहन आल्याने त्यांनी दुचाकीचे ब्रेक लावले. यामुळे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने (क्र.एमएच-३८-व्ही.२१२५) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके, जमादार रवीकांत हरकाळ, गजानन पोकळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात पाठविले. तसेच हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, जखमी दोघांनाही शासकिय रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नागरीकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, अपघातग्रस्त जीप वसमतच्या पंचायत समिती कार्यालयाची असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या कामासाठी पंचायत समितीचे कर्मचारी हिंगोलीत आले होते. त्यानंतर परत जातांना हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जीप चालकास ताब्यात घेण्यात आल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बंदखडके यांनी सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...