आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हतनूर:बिबट्या मागे लागल्याने युवक विहिरीत, कन्नड तालुक्यातील प्रकार; ग्रामस्थांनी बाहेर काढले

हतनूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील हतनूर-शिवराई परिसरात टोलनाक्यापासून aजवळच रोडवर रात्री एक वाजेच्या सुमारास चार युवक उभे असताना अचानक बिबट्याने त्यांच्याकडे धाव घेतली. यात शिवा बुधा हा युवक पळताना गट नं. २७० मधील विहिरीत पडला. तसेच इतर रमेश अधलवारी, उद्धव शहा व दिनेश शहा हे तिघे वेगवेगळ्या दिशांना पळाले. यामध्ये शिवा बुधा हा विहिरीत पडल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

शिवा बुधा याच्या साथीदारांनी आरडाओरड केल्यावर स्थानिक नागरिक अरुण पंढरीनाथ वाघ, भगवान दामू वाघ, अभिषेक गायके, पवन घुगे, ऋषिकेश पवार, नितीन नागोडे यांनी जखमीस दोरीच्या साह्याने बाहेर काढले. ही घटना १ जून रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. हे युवक परराज्यातील असून हॉटेल रायगड येथे कामासाठी आलेले आहेत. शिवना-टाकळी परिसरात आधीपासूनच ऊस क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याची दहशत होती. परंतु, आता हतनूर, शिवराई, रुईखेडा, जैतापूर, टापरगाव, खेडा परिसरातदेखील बिबट्या दिसत आहे. याआधीही अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी वन विभागाने लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...