आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षाखालील गुलाबी चेंडू क्रिकेट:व्हीनसची गुरुकुल संघावर 14 धावांनी मात, मतेच्या 2 षटकांत 4 धावा

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपीट मैदानावर सोमवारपासून सुरू झालेल्या 25 वर्षाखालील गुलाबी चेंडूवरील क्रिकेट स्पर्धेत पहिल्या लढतीत व्हिजन संघाने 14 धावांनी शानदार विजय मिळवला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हिजन संघाने 20 षटकांत सर्व गडी गमावत 132 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात गुरुकुल अ संघ निर्धारित षटकात 6 बाद 118 धावा करू शकला.

नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना व्हिजनची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले. मधल्या फळीतील अभिजीत भगतने सर्वाधिक 38 धावा केल्या. त्यानंतर सुरज राठोडने 13, भूषण नावंदेने 29, तळातील फलंदाज अंकित जाधवने 12 व अनिल थोरेने 19 धावा जोडल्या. गुरुकुलकडून मयुरेश वैष्णवने 3 आणि ओंकार मानेने 2 गडी बात केले. रमेश शिरळेने एकाला टिपले.

मतेच्या 2 षटकांत 4 धावा

प्रत्युत्तरात गुरुकुल संघाला संथ फलंदाजी भोवली. व्हिजनच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने गुरुकुलला धावा करण्याची संधी मिळाली नाही. गणेश मतेने 2 षटकात अवघ्या 4 धावा दिल्या. धीरज थोरातने 4 षटकांत 19 धावा देत एक गडी बाद केला. त्याने एक षटक निर्धाव टाकले. गुरुकुलकडून अमोल मोठेने सर्वाधिक 39 धावा केल्या. निहार वाकडीकरने 26, सोहम राठोडने 11, अरीन देशमुखने 10 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. अनिकेत जाधवने दोन गडी बाद केले. अनिल थोरे, अभिजीत भगत, सुरज राठोड यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...