आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:उद्धव गटाला 8 वॉर्डांत बसू शकतो फटका, माजी आमदार हर्षवर्धन जाधव मनपात सक्रिय

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव औरंगाबाद मनपा राजकारणात सक्रिय होत आहेत. रायभान जाधव विकास आघाडी रिंगणात उतरवण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्या प्रत्यक्षात आल्या तर आठ वाॅर्डांमध्ये शिवसेना उद्धव गटावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असा प्रवास केलेले जाधव म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्व आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक आरोप केल्यानंतर ते राजकारणातून संन्यास घेणार, अशीही चर्चा होती. पण ती खरी नसल्याचे त्यांनी मनपा मुख्यालयासमोर उपोषण करून दाखवून दिले. त्यांच्या मागणीनुसार स्मार्ट सिटी प्रकल्पातील रस्त्यांची ८६ कामे रद्द झाली आहेत. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या मनपात शिरकावाची सुरुवात झाली आहे. आता त्यांचे किमान ५० उमेदवार असतील. सिडको-हडको, ठाणा, पडेगाव - भावसिंगपुऱ्यावर त्यांचे लक्ष असेल, असे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...