आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:उद्धवसेनेला 60% मते भाजपचीच, तेवढी त्यांना काँग्रेस - राष्ट्रवादीची कधीच मिळणार नाहीत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तत्कालीन शिवसेनेत अंतर्गत कलह होता, मात्र तरीही आम्हीच त्यांना निवडून आणले असाही दावा
  • आता दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बूथ नियोजन, पंतप्रधान मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपला विजय मिळण्याची अपेक्षा

परभणी, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेची संघटनात्मक ताकद भाजपपेक्षा खूप जास्त आहे. शिवाय आता काँग्रेस, राष्ट्रवादीची एकगठ्ठा मते आमच्याच पदरात पडणार आहेत. त्यामुळे भाजपने कितीही उड्या मारल्या तरी येत्या लोकसभेला आमचा विजय निश्चित असल्याचा दावा उद्धवसेनेचे परभणीतील खासदार संजय जाधव, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१९मध्ये तत्कालीन शिवसेनेत अंतर्गत कलह होता. मात्र, तरीही आम्हीच त्यांना निवडून आणले. या दोन्ही खासदारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी ६० टक्के मते भाजपचीच होती. आणि २०२४मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांची एवढी मते त्यांना कधीच मिळणार नाहीत. पण तरीही ते तसे म्हणत असतील तर तो त्यांचा निव्वळ भ्रम आहे. तो फुटणार आहेच. आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये बूथ नियोजन, मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपच्या पदरात विजय पडू शकतो.

परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आणि औरंगाबाद लोकसभा लढण्याच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घोषणेवर खासदार जाधव म्हणाले की, येथे उद्धवसेनेचेच जाळे मजबूत आहे. परभणीच्या विकासासाठी आम्हीच प्रयत्न केले. भाजपची येथे ताकदच नाही. भाजप परभणी लढवत असेल तर शिंदेसेना काय करणार? तर निंबाळकर म्हणाले की, केवळ निवडणूक व्यवस्थापनाने निवडणुका जिंकता येत नाही. उस्मानाबादमध्ये कोण काम करतो. कुणाचे नेटवर्क आहे, हे सामान्य मतदाराला पक्के माहिती आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घोषणेवर दावे - प्रतिदावे सुरूच
पाच आमदार भाजप-शिंदेसेनेचे

भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर म्हणाले की, तत्कालीन शिवसेनेत विरोध असूनही भाजप बूथ प्रमुखाच्या नियोजनामुळे ओमराजे निवडून आले. तुळजापूरला राणा जगजितसिंह, औशात अभिमन्यू पवार, बार्शीत राजेंद्र राऊत भाजपचे आमदार आहेत. उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, परंड्याचे डाॅ. तानाजी सावंत शिंदेसेनेचे आहेत. उद्धवसेनेकडे फक्त कैलास पाटील आहेत.

जाधव यांना विसर पडला
भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे म्हणाले की, मोदी लाटेवर निवडून आल्याचा जाधव यांना विसर पडला. जिंतूरला भाजपच्या मेघना बोर्डीकर आमदार (१,१६,९१३मते) आहेत. भाजपचे सहयोगी रत्नाकर गुट्‌टे गंगाखेडचे आमदार (८११६९ मते) आहेत. भाजपएवढी म्हणजे ६० टक्के मते काँग्रेस-राष्ट्रवादीचा कट्टर मतदार उद्धवसेनेला कधीच देणार नाही.

बूथपर्यंत जाळे हीच भाजपची शक्ती
^औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, हिंगोलीत लोकसभेत बूथ टेन यूथ, पन्नाप्रमुख मिशनमुळे थेट गावांपर्यंत नेटवर्क आहे. परभणी असो अथवा उस्मानाबाद या दोन्ही लोकसभेत शिवसेनेवर लोकांची २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. ती अजूनही उद्धवसेनेवर कायम आहे. भाजपची काय ताकद आहे, हे या दोघांनाही दीड वर्षानंतर लक्षात येईल, याविषयी शंकाच नाही.
प्रवीण घुगे, प्रदेश सचिव, भाजप

बातम्या आणखी आहेत...