आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरवापसी:उद्धवसेनेचे कार्यकर्ते 48 तासांतच माघारी परतले; शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले, त्यांना खूप शुभेच्छा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३ डिसेंबर रोजी उद्धवसेनेतून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांनी ४८ तासांतच माघार घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या विशेष मोहिमेमुळे ही घरवापसी झाली. त्यामुळे शिंदेसेनेला मोठा धक्का बसला आहे. पण शिंदेसेनेेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, विरोधी पक्षनेतेच या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत.

पडेगाव, मिटमिट्यातील उद्धवसेनेचे शहर उपप्रमुख अंबादास म्हस्के आणि दानवे व जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, शाखाप्रमुख प्रकाश दुबिले, नवनाथ मुळे, किसन कणसे, किरण पेरकर, गोविंद खांड्रे, कृष्णा मुळे १३ डिसेंबर रोजी शिंदेगटात गेले. त्यांना जंजाळ यांनी जबरदस्तीने गाडीत टाकून आमदार संजय शिरसाट यांच्याकडे नेले, असा आरोप उद्धवसेनेच्या पत्रकात करण्यात आला आहे. म्हस्केंनी लोकांच्या दबावामुळे माघार घेतली, असे तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड म्हणाले. तर गैरसमजातून पक्षांतर झाले, असे तनवाणींचे म्हणणे आहे. दरम्यान, पडेगाव, मिटमिटा येथील जमिनी हेच या पक्षांतर नाट्याचे मूळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बातम्या आणखी आहेत...