आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मराठवाड्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी हेच भाजपला पराभूत करण्याचे उद्धवसेनेचे एकमेव सूत्र

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धवसेनेचे खासदार म्हणाले : परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबादेत भाजपची ताकदच नाही. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मते आम्हाला मिळणारच. त्यामुळे भाजपच्या दाव्याची अजिबात चिंता नाही

आतापर्यंत शिवसेना लढत असलेल्या औरंगाबादसह हिंगोली, परभणी, उस्मानाबाद लोकसभेच्या जागा आता भाजप लढणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी तीन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच जाहीर केले. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी (२ जानेवारी) औरंगाबादेत सभा घेतली. त्यात त्यांनी कराडांच्या वक्तव्याला पाठिंबा देणारी कोणतीही घोषणा केली नाही. तरीही या निमित्ताने राजकीय दंडबैठका काढणे सुरू झाले आहे.

उद्धवसेनेच्या खासदारांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने संपर्क साधला असता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची उद्धवसेनेला मते मिळणारच, असे या खासदारांना पक्के वाटत आहे. तेच भाजपला पराभूत करण्याचे एकमेव सूत्र असेल, अशीही गणिते ते मांडत आहेत. मराठवाड्यात ज्या मतदारसंघावर भाजप दावा करते तेथे त्यांची संघटनात्मक ताकदच नाही. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा आम्हाला भक्कम पाठिंबा असल्याने भाजपच्या दाव्याची अजिबात चिंता नाही, असे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये औरंगाबादेत एमआयएमने निसटता विजय मिळवला. त्यामुळे मराठवाड्यात चारही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले ओळखले जातात. आता राजकीय समीकरणे बदलल्याने चारही ठिकाणी लढण्याची तयारी भाजप करत आहे.

अजून निर्णय झालाच नाही : शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख जंजाळ म्हणाले की, जागांच्या अदलाबदली अथवा कोणाला कोणते मतदारसंघ द्यायचे याचा निर्णय अजून झालेलाच नाही. वरिष्ठस्तरावर बोलणी होतीलच. पण औरंगाबाद लोकसभेत आम्हाला चंद्रकांत खैरेंना धूळ चारायची आहे. त्यांनी राजकीय संन्यास घेतला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे औरंगाबाद आमच्याकडे राहावे असाच आमचा आग्रह राहिल.

जंजाळ : खैरेंना धूळ चारण्यासाठी शिंदेसेना लढणार
असे होते २०१९चे आकडे

उद्धवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांना २०१९मध्ये ५ लाख ३८ हजार ९४१, राष्ट्रवादी-काँग्रेसचे राजेश विटेकर यांना ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली होती. उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकरांना ५ लाख ९६ हजार ६४०, राष्ट्रवादीच्या राणा जगजित यांना ४ लाख ६९ हजार ०७४ मते मिळाली होती. उस्मानाबाद, परभणीत भाजपच्या १ लाखापेक्षा जास्त हक्काची फारशी मते नाहीत, असे म्हटले जाते. जाधव, निंबाळकरांनीही असेच गणित मांडले.

शिंदेसेनेच्या मदतीने ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य : बावनकुळे
मुंबई | शिंदेसेनेला सोबत घेऊनच महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे, अशी सारवासारव प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ते म्हणाले की, शिंदेसेनेशी युती करूनच आम्ही मैदानात उतरणार आहोत. मात्र शिंदे समर्थक १२ खासदारांना जागा सोडणार की नाही, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देणे त्यांनी टाळले

बातम्या आणखी आहेत...