आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा:चंद्रकांत खैरे यांची मागणी; म्हणाले - कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात आठवड्यात 6 आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे तरुण बेरोजगारीमुळे त्रस्त असतांना शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाने दाणादाण उडल्याने शेतकऱ्यांचे गव्हु, मका, हरभरा,भाजीपाला, फळबागा आदीचे नुकसान झाले. धक्कादायक बाब म्हणजे राज्याच्या कृषी मंत्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवड्यात 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एकट्या सिल्लोडमध्ये 3 जणांनी जीवन संपविले. नैतिक जबाबदारी घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार

चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपासून गंगापूर, वैजापूर, कन्नड आदी तालुक्यातील गावात भेटी दिल्या. या पिकांची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी सोमवारी 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे.

हे ही वृत्त वाचा

ईडीच्या पैशातून सोमय्यांना कमिशन मिळते:माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

ईडीच्या पैशातून भाजपचे नेते किरीट सोमय्यांना कमिशन मिळत असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ईडीच्या पैशातून सोमय्या यांना कमिशन मिळेल. हे असेच असतात. इन्कम टॅक्सला ज्या खबऱ्याने माहिती दिली, त्या खबऱ्याला त्यांना काहीतरी द्यावे लागत असते. तसेच याचे काम आहे, ईडीच्या कारवाईबाबत भाजपच्या माणसाला कसे काय कळते की, उद्या कोणाकडे धाड पडणार आहे, असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. या सर्व मिलीभगतमधून भाजपचे लोक नागरिकांना आणि विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...