आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात जल्लोषाचे वातावरण:उद्धव ठाकरे गटाला कुठलेही भवितव्य नाही, त्यांचे आमदार आता आमच्याकडेच येतील- संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे हे सरकार आता स्थिर असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यामुळे आता कोण काय बोलताे, याला काहीच अर्थ नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी हे सरकार चाललेले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला आता कुठलेही भवितव्य राहिलेले नाही. त्यांचे आमदार आता पुन्हा आमच्याकडेच येतील, असा दावा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केला.

न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला झटका बसला आहे. अनेक लोक हे सरकार पडावे म्हणून पाण्यात देव ठेवून बसले होते. चंद्रकांत खैरेंच्या यज्ञाने काही होणार नाही. आम्ही लोकांचे काम करत होतो. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असे सहकारमंत्री अतुल सावे म्हणाले.

राज्यात जल्लोषाचे वातावरण

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. त्यामुळे जे लोक नैतिकतेचा विषय सांगत आहेत त्याला आता काहीही अर्थ उरला नाही. या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष केला जात आहे. जनतेच्या हिताचे काम करणारे हे सरकार असल्याचे भुमरे म्हणाले.

आमदार संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासमाेर गुरुवारी संध्याकाळी ढोल-ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख संतोष आम्ले, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे अादींची उपस्थिती होती.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्यच
शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. शिंदे -फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी जी पद्धत वापरली ती पूर्ण अयोग्य हाेते. त्यामुळे आता तरी नैतिकता बाळगून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद