आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटकारे:घरी बसून विकासकामे मार्गी लावली, पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा टोला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादेत मुख्यमंत्री ठाकरेंनी मागवली सहकाऱ्यांसारखी खुर्ची - Divya Marathi
औरंगाबादेत मुख्यमंत्री ठाकरेंनी मागवली सहकाऱ्यांसारखी खुर्ची

कोरोनाकाळात मी नुसता घरी बसून नव्हताे. राज्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावत होतो. त्यामुळेच आज विविध कामांची उद्घाटने होत आहेत. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, अशी टीका करणाऱ्यांना आम्ही काय केले हे लवकरच दिसेल, असा टाेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

राज्यातील सर्वात मोठ्या १६८० कोटींच्या जल योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या वेळी ते म्हणाले, काहींना ‘लाडके मुख्यमंत्री’ असे बिरुद लावले जाते. कामे न करता लाड करून घ्यायला मला आवडत नाही, असा चिमटाही त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना काढला.

बीड-जालन्यात २०० काेटींची गुंतवणूक, वॉटर ग्रीडसाठी २६५ कोटी
शेंद्रा -बिडकीन कॉरिडॉर तसेच ऑरिक सिटीत आयटी बेस व मोठे उद्योग आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टाटा कन्सल्टन्सीशी बोलणी झाली आहे. तसेच आरोग्याच्या सुविधांसाठीही उद्योग पार्क तयार करण्यात येईल. बीड, जालना येथे २०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

- पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या घरातील हौद श्रीखंड्याच्या कावडीने भरला. या आख्यायिकेचा संदर्भ देत देसाई म्हणाले, श्रीखंड्याच्या रूपाने मुख्यमंत्र्यांच्या हातून पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होत आहे.
- जल जीवन मिशन योजनेतून पाणी समस्या संपुष्टात येईल. त्यासाठी ११ हजार ५०० कोटींचे नियोजन केले असून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी २८५ कोटी रुपयांचा निधी आहे, असे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
- समृद्धी महामार्ग ठरेल गेम चेंजर : कोरोना संकटातही सरकारचे काम दमदारपणे सुरू आहे. यात समृद्धी महामार्ग महत्त्वाचा असून त्याचा शहरासह मराठवाड्यालाही लाभ होईल. हा महामार्ग गेम चेंजर ठरेल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सिंहासन नको, खुर्चीच बरी!
औरंगाबादेत मुख्यमंत्री ठाकरेंनी मागवली सहकाऱ्यांसारखी खुर्ची
1.
औरंगाबादेत शनिवारी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सिंहासनाची व्यवस्था केली होती.
2. व्यासपीठावर एक सिंहासन आणि सहकारी मंत्र्यांसाठी साध्या खुर्च्या पाहताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सिंहासन हटवून साधी खुर्ची मागवली.
3. मुख्यमंत्र्यांनी सूचना देताच त्यांचे सुरक्षा रक्षक आणि आयोजकांची धावपळ उडाली.त्यांनी तत्काळ सिंहासन हटवून खुर्ची ठेवली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser