आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. अंबादास दानवेंना बढती:विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, उद्धव ठाकरेंची सभापतींकडे शिफारस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, अशी शिफारस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद सभापतींकडे केली आहे. याबाबत आजच उद्धव ठाकरेंनी सभापतींकडे पत्र पाठवले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेले आमदार अंबादास दानवे यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

निवडीचा मला अधिकार - ठाकरे

सभापतींना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, शिवसेना विधिमंडळ पक्षाची 9 जुलै 2022 रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्भव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला आहे. त्यानुसार, मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर विधान परिषद सदस्य अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस करत आहे.

शिवसेनेतून हकालपट्टी

दरम्यान, शिंदे गटासोबत गेलेल्या नांदेड जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यानुसार, नांदेड जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, जिल्हाप्रमुख आनंद बोढारकर, नांदेड उत्तर तालुकाप्रमुख जयंतराव कदम, धर्माबाद तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे, भोकर तालुकाप्रमुख अमोल पवार, नांदेड शहरप्रमुख तुलजेश यादव यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...