आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात भूमिका बदलली:गद्दार म्हणणाऱ्यांना रोज कसे पाहू, म्हणत उद्धव यांचा फोटो हटवला

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटात सामील झालेले औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कोकणवाडीतील संपर्क कार्यालयातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून टाकला आहे. त्या जागी आता ‘नव्या शिवसेने’चे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत नेते आनंद दिघे यांचा फोटो लावला. ‘उद्धव ठाकरे जर आम्हाला गद्दारच म्हणत असतील तर त्यांचा फोटो समोर पाहावा वाटणार नाही. त्यामुळे तो काढला. एकनाथ शिंदे आता आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो मी लावला,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

२० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, त्यांच्यासोबत आमदार शिरसाट सुरुवातीपासून होते. १६ दिवसांनी सत्तांतराच्या नाट्यानंतर ६ जुलै रोजी शिरसाट शहरात आले तेव्हा त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तेव्हाही त्यांच्या संपर्क कार्यालयातील केबिनमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. ‘ आम्ही शिवसेनेतच आहोत, उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत’ असे वक्तव्य तेव्हा शिरसाट यांनी केले होते. मात्र नंतरच्या काळात ठाकरे व शिंदे गटात तणाव वाढत गेला. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शहरातील बंडखोर आमदारांच्या कार्यालयाला भेट दिली, त्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी उद्धव यांचा फोटो काढून तिथे शिंदेंचा फोटो लावला. मात्र बाळासाहेबांचा फोटो कायम ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...