आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UGC NET साठी 30 व्या वर्षी उमेदवार करू शकतील अर्ज:NTN ने जारी केले परिपत्रक; राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची 5 वर्षे सूट

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट परीक्षेत ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे. आता 30 वर्ष वयाचे युवक देखील फेलोशिपसाठी अर्ज करु शकतील. यासंदर्भातील एक परिपत्रक एनटीए ने नुकतेच जारी केले आहे.

यापूर्वी युजीसीद्वारे 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत निर्धारित केलेली वयोमर्यादाच परीक्षेसाठी गृहित धरण्यात येणार होती. एनटीएने यात बदल केला आहे. यामुळे परीक्षेला बसणाऱ्या युवकांचे वय आता 2 डिसेंबर 2022 पर्यंत 30 वर्ष असणे आवश्यक आहे. तर असिस्टंट प्रोफेसरसाठी कमाल वयोमर्यादा असणार नाही.एससी, एसटी, ओबीसी, एनसीएल, ट्रान्सजेंड, महिला उमेदवारांना अधिकतम वयोमर्यादेत पाच वर्षांची सुट देण्यात आली आहे. तर एलएलएम पदवी करणाऱ्यांना तीन वर्षांची सवलत देण्यात आली आहे. तसेच सैनिकी सेवेत असणाऱ्यांना देखील पाच वर्षांची सवलत वयोमर्यादेत देण्यात आली आहे.

सध्या युजीसी नेट करिता अर्ज प्रक्रिया सुरु असून, अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख 17 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. नेट परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत असणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपले केंद्र आणि शहर उमेदवारांना कळवण्यात येणार आहे. चौकट गेट परीक्षेचे हॉलतिकीट सोमवारपासून मिळणार

ग्रेजुएट अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनिअरिंग साठीचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना 9 जानेवारी पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गेट 2023 नुसार गेट परीक्षा कंम्प्युटर बेस्ड असणार आहे. एकूण 29 विषयांसाठी तीन तासाची परीक्षा असणार आहे. अधिक माहिती आणि हॉलतिकीटसाठी विद्यार्थी gate.iitk.ac.in संकेतस्थळ पाहू शकतील.

बातम्या आणखी आहेत...