आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झकाऽऽस:उजाड माळरान बनले ‘व्हॅली ऑफ फ्लाॅवर’, गाैताळा अभयारण्याजवळील पूरणपूर परिसरात 40 प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी बहरले पठार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रवीण ब्रह्मपूरकर
  • कॉपी लिंक
कन्नड तालुक्यातील गाैताळ्याजवळ १२ हेक्टर, साराेळ्याजवळ १२ हेक्टर, खडीपिंपळगाव (ता. खुलताबाद) येथे साडेतीन हेक्टर, तर अजिंठा व्ह्यू पॉइंटजवळ दोन हेक्टरवर झकास पठार फुलवण्याचे काम सुरू आहे. फोटो क्रेडिट - प्रविण ब्रह्मपुरकर आणि रवी खंडाळकर - Divya Marathi
कन्नड तालुक्यातील गाैताळ्याजवळ १२ हेक्टर, साराेळ्याजवळ १२ हेक्टर, खडीपिंपळगाव (ता. खुलताबाद) येथे साडेतीन हेक्टर, तर अजिंठा व्ह्यू पॉइंटजवळ दोन हेक्टरवर झकास पठार फुलवण्याचे काम सुरू आहे. फोटो क्रेडिट - प्रविण ब्रह्मपुरकर आणि रवी खंडाळकर
  • या कामाला सुरुवात झाली व अवघ्या तीन महिन्यांत हा परिसर रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेला.

सातारा जिल्ह्यातील कास पठारप्रमाणेच गाैताळा अभयारण्याच्या परिसरात झकास पठार फुलले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या कल्पनेतील हे ४० वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या ताटव्यांचे पठार बहरले आहे. मागच्या उन्हाळ्यात १२ हेक्टरवर बीज टाकण्यात आले हाेते. या कामाला सुरुवात झाली व अवघ्या तीन महिन्यांत हा परिसर रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेला.

औरंगाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी असे प्रयाेग केले जात असून पुढील पाच वर्षांत हा संपूर्ण प्राेजेक्ट पूर्ण हाेईल, असे डाॅ. गाेंदावले यांनी सांगितले. कन्नड तालुक्यातील गाैताळ्याजवळ १२ हेक्टर, साराेळ्याजवळ १२ हेक्टर, खडीपिंपळगाव (ता. खुलताबाद) येथे साडेतीन हेक्टर तर अजिंठा व्ह्यू पॉइंट जवळ दोन हेक्टरवर झकास पठार फुलवण्याचे काम सुरू आहे.

मंगेश गोदवले, सह संचालक महावितरण (माजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी)

पूरणपूर व सीताखाेरीच्या व्ह्यू पाॅइंटपासून दाेन किलाेमीटर अंतरावर हे झकास पठार आहे. भाेवताली माेठमाेठे डाेंगर, दऱ्या, त्यातून वाहणारे धबधबे अशा बहरलेल्या निसर्गातून पायवाट तुडवत तिथे जावे लागते. तीन महिन्यांपूर्वी इथे झिनिया जातीच्या झाडांचे बीजाराेपण केले हाेते. आता त्याला पांढरा, जांभळा, गुलाबी, लाल पिवळा, नारंगी अशा सहा प्रकारच्या फुलांचा बहर आलेला आहे.

या ठिकाणी काही व्ह्यू पाॅइंट तयार केले आहेत, जिथून पर्यटक फुलांचे ताटवे पाहू शकतील. पावसाच्या पाण्यावर ही झाडे व फुले फुलली आहेत. पूरणवाडीचे ग्रामसेवक के.व्ही. गायके यांनी सांगितले की ‘पूर्वी उजाड असलेले माळरान आता चित्रपटातील एखाद्या स्थळासारखे प्रसन्न वाटते. पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनत आहे. या माध्यमातून गावचाही विकास हाेईल.’

फक्त फुले ताेडू नका
नव्याने विकसित हाेणारी झकास पठारची चारही ठिकाणे वेरूळ- अजिंठ्यापासून तीस ते चाळीस किमीच्या अंतरावर आहेत. त्यामुळे ऑक्टाेबरनंतर येणाऱ्या पर्यटकांसाठी हे नवे पर्यटनस्थळ उपलब्ध हाेईल. यातून ग्रामीण भागात राेजगाराच्या संधीही उपलब्थ हाेतील. या प्रकल्पासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत २५ लाख खर्च झाले आहेत. पर्यटकांनी झकास पठारचा आनंद घ्यावा, फक्त फुले ताेडू नयेत, असे आवाहन डाॅ. गाेंदावले यांनी केले आहे.

पक्ष्यांचा वाढला सहवास
झकास पठार बहरल्यामुळे या भागात फुलपाखरे, मधमाशा व इतर पक्ष्यांचा सहवास वाढला आहे. प्रत्येक फुलावर मधमाशा, भुंगे दिसून येतात. इकोसिस्टिमही चांगल्या पद्धतीने वाढत आहे. पूर्वीच्या हंगामी नैसर्गिक वनस्पतींना कुठलाही धक्का न लावता नव्या वनस्पतींचे रोपण करण्यात आले आहे.

४० वनस्पतींची लागवड
प्रकल्प संचालक स्वप्निल सरदार यांनी सांगितले की ‘आम्ही ७० प्रकारच्या वनस्पतींचे साधारण ३०० किलाे बियाणे चारही ठिकाणी लावले हाेते. यात पूरणगावात ४० प्रकारच्या वनस्पतींचे ४५ किलाे व तागाचे ६० किलाे बियाणे लावले आहे, तर पाणथळ असलेल्या ठिकाणी पांढऱ्या फुलांची दुधाडी, गुलाबी गोधडी, जांभळी मंजिरी पाहायला मिळते.

मुरमाड भागात पिवळ्या रंगाची सोनकीची फुले आहेत. विंचवी, पांढरा गुलाबी, लाल रंगाचा तेरडा, जांभळा रंगाची गवती तिळवण, खुळखुळा, अंबाडी, ताग हेदेखील आले आहेत.

झकास पाठराजवळ असलेला धबधबा

बातम्या आणखी आहेत...