आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचा सहायक प्राध्यापक डॉ. अशोक बंडगर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश असताना तो विशाखा समितीकडे परस्पर खुलासे पाठवत आहे. विद्यापीठाने त्याला ८ मे रोजी पुन्हा नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत हजर राहण्याचा अल्टिमेटम दिला आहे, तरीही तो वकील, दूतामार्फत आणि टपालाने खुलासा पाठवत आहे.
असे खुलासे आम्ही अजिबात गृहीत धरणार नाही, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचे शोषण करणारा बंडगर आणि त्याची पत्नी १३ दिवस झाले तरीही फरार आहे. विद्यापीठाने त्याला दहा दिवसांत प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचे आदेश २४ एप्रिल रोजी दिले होते.
ही मुदत ६ मे रोजी संपली आहे. त्यामुळे अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या पीठासीन अधिकारी डॉ. अंजली राजभोज यांनी पुन्हा त्याला अल्टिमेटम दिला आहे. ८ मे रोजी तशी नोटीस त्याच्या घरावर चिकटवण्यात आली आहे. त्याशिवाय त्याच्या मेलवरही पाठवण्यात आली आहे. तरीही तो प्रत्यक्ष हजर राहण्याऐवजी विद्यापीठ प्रशासनाला लेखी खुलासा पाठवत आहे.
१ ते ४ मे दरम्यान त्याने विशिष्ट दूतामार्फत खुलासा दिला. विद्यापीठाने तो खुलासा स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने वकिलामार्फत खुलासा दिला तोही घेतला नाही. टपालाने एक खुलासा पाठवला. विद्यापीठाने टपालाने आलेला खुलासाही गृहीत धरलेला नाही.
विद्यापीठ प्रशासनाला प्रतीक्षा डॉ. अंजली राजभोज यांच्या अहवालाची डॉ. बंडगरच्या निलंबन आदेशावर मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीही तो फरार आहे. शिवाय नाट्यशास्त्र विभागातील मस्टरवर सहीही करत नाहीये. त्यामुळे आता आम्हाला फक्त अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे कुलगुरूंनी म्हटले आहे. दुसऱ्या नोटिसीमध्ये ७ दिवसांची मुदत असून १३ मे रोजी ही मुदतही संपणार आहे. त्यानंतर समिती एकतर्फी अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर विभागीय चौकशी केली जाईल. या चौकशीत दोषी आढळला तर त्याला बडतर्फ करण्यात येईल, असेही कुलगुरूंनी सांगितले आहे.

Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.