आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षाखालील गुलाबी चेंडूंवरील टी-20 क्रिकेट स्पर्धा:गुरूकुल 'ब' संघ अंतिम फेरीत, उपांत्य लढतीत एमआयटीवर 114 धावांनी मात

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपीट मैदानावर सुरू असलेल्या 25 वर्षाखालील गुलाबी चेंडूंवरील टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरूकुल 'ब' संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत गुरूकुलने एमआयटी संघावर 114 धावांनी मात केली. अष्टपैलू खेळाडू हरमितसिंग रागी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना गुरूकुलने 20 षटकांत 8 बाद 193 धावा उभारल्या. यात ऋषिकेश सपकाळने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 32 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचत 55 धावा ठोकल्या.

युवा फलंदाज शुभम हरकळने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने 28 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 5 षटकार लगावले. सलामीवीर मधुर पटेल भोपळाही फोडू शकला नाही. मुकुल जाजूने 13, ऋषिकेश तरडेने 28, आदर्श जैनने 21 व अष्टपैलू हरमितसिंग रागीने 18 धावा जोडल्या. एमआयटीचा गोलंदाज राकेश यादवने 3 बळी घेतले. सुमीत चव्हाणने 2 आणि प्रफुल्ल कमलानी, अक्षय नरवडे व प्रज्वल घोडकेने प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

हरमितपुढे एमआयटीचे फलंदाज अडखळले

प्रत्युत्तरात एमआयटीचा संघ 15 षटकांत 8 बाद अवघ्या 79 धावांवर ढेपाळला. अष्टपैलू हरमितसिंग रागीने 3 षटकांत अवघ्या 5 धावा देत 4 गडी बाद केले. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे एमआयटीचे फलंदाज चांगले अडखळले. यात संघाची सुरुवात खराब झाली. आघाडीचे चार फलंदाज एकेरी धावेवर तंबूत परतले.

सलामीवीर प्रज्वल घोडके (1), शुभम कांबळे (4), सौरव बिराजदार (8) आल्यापावली परतले. प्रफुल्ल कमलानी, अक्षय नरवडे आणि करणजराज सिंग जग्गी शून्यावर बाद झाले. मधल्या फळीतील कार्तिक बाकलिवालने 14 धावा केल्या. गोपाल दाडने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याने 31 चेंडुचा सामना करताना 5 चौकार खेचले.

राकेश यादवने 3 धावा केल्या. गुरूकुलकडून शुभम मोहितीने 14 धावांत 2 गडी बाद केले. ऋषिकेश तरडे व संदीप सहानीने प्रत्येकी 1-1 फलंदाज टिपला आहे.

बातम्या आणखी आहेत...