आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षाखालील गुलाबी चेंडूवरील टी-20 स्पर्धा:गुरूकुल ब संघाची एचएसजेवर 2 गड्यांनी मात; अष्टपैलू शुभम, ऋषिकेश चमकले

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपीट मैदानावर सुरू असलेल्या 25 वर्षाखालील गुलाबी चेंडूवरील टी-20 क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात गुरूकुल ब संघाने 2 गड्यांनी विजय मिळवला. या लढतीत प्रथम फलंदाजी करताना एचएसजेने 20 षटकांत 7 बाद 179 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात गुरूकुलने 18 षटकांत 8 गडी गमावत 183 धावा करत विजय साकारला. गुरूकुलचा शुभम मोहिते सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम खेळताना एचएसजेच्या सलामीवीर जाेडीने चांगली सुरूवात केली हाेती. समर्थ राजने 23 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकांत 34 धावा काढल्या. विश्वराज राजपूतने 13 चेंडूंत 20 धावा केल्या. गौरव शिंदे भोपळाही फोडू शकला नाही. अभिजित सावळेने 35 चेंडूंत 36 धावा बनवल्या. तळातील फलंदाज अंबादास हाकाने सर्वाधिक 43 धावा ठाेकल्या. त्याने 19 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकार खेचले. ओंकार ठाकूरने 11 व जे.आर. दादाने 17 धावा जोडल्या. गुरूकुलच्या ऋषिकेश तरडेने 3 बळी घेतले. हरमितसिंग रागी, शुभम मोहिते, संदीप सहानीने 1-1 गडी बाद केला.

अष्टपैलू शुभम, ऋषिकेश चमकले

गुरूकुलने मधल्या फळीतील फलंदाजांच्या जोरावर विजय मिळवला. आघाडीचे दोन फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले. ऋषिकेश सपकाळेने 33 चेंडूंत 6 चौकारांसह 2 षटकार खेचत 48 धावा काढल्या. शुभम मोहितेने 33 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार लगावत 46 धावा केल्या. मधुर पटेलने अवघ्या 15 चेंडूंत 41धावा ठोकल्या. त्याने 2 चौकार व 4 षटकार खेचले. मुस्तफा शाहने 12 व हरमितसिंग रागीने 7 धावांचे योगदान दिले.

एचएसजेकडून अभिजित सवळेने 4 गडी बाद केले. गौरव खाडेने 2 व आदित्य कराडखेडेने 1 बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...