आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रेनेजलाइनसाठी उपोषण:भीमशक्तीच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे मनपासमोर आंदोलन सुरु

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांपासून शहरातील नागरी समस्या सोडवण्यात मनपा अपयशी ठरत आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइन बदलणे व इतर किरकोळ समस्या सोडवण्याच्या प्रमुख मागणीसाठी १२ डिसेंबर रोजी भीमशक्तीच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे मनपासमोर उपोषण सुरू आहे. रहेमानिया कॉलनी गल्ली नंबर ६ मध्ये ११ वर्षांपूर्वी काम झाले होते. त्यानंतर मनपाने काेणतेही काम केले नाही. नळाला पाणी आले की ड्रेनेजलाइनचे पाणी चोकअप होत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. मनपा आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊनही समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांनी उपोषणाचा पर्याय निवडला आहे. या वेळी कैसर खान, शेख रफिक, शेख आसिफ, शेख रईस खान, इब्राहिम पटेल, ताहेर पटेल, रफिक पटेल, सलीम पटेल, सय्यद आसेफ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...