आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीड महिण्यापूर्वी आईची हत्या झाली; त्यानंतर पंधराच दिवसांपूर्वी स्वतःचा विवाहही उरकला पण लगेचच त्याने चोरीचा 'प्रताप' सुरु केला. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी महिला दुकानदाराच्या कानातील झुंबर हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला अन् सीसीटीव्ही फुटेजमुळे पकडलाही गेला. हा प्रकार आज दुपारी घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयितांना अटक केली.
सुंदरलाल बाबुराव राठोड (37, मुकूुंदवाडी), सतिष संजय पवार (21, मुकूंदवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील सतिषच्या आईची दिड महिन्यांपुर्वीच हत्या झाली होती. त्यानंतर गुन्हेगार मित्रामुळे पंधरा दिवसांपुर्वीच लग्न झालेला सतिषला पोलिस कोठडीची हवा खावी लागली.
रामनगर मध्ये इंद्रायणी शिवाजी इलग (50) यांचे किराणा दुकान आहे. दुपारी चार वाजता त्या दुकानात बसल्या होत्या, त्यावेळी दुचाकीवरुन त्यांच्याकडे दोन तरुण आले. आधी इकडे तीकडे पाहत त्यांनी सिगारेट घेतली. त्यानंतर काही क्षणात महिला दुकानदाराचा कान पकडून त्यांच्या कानातील सोन्याच्या झुंबरला जोरात झटका देऊन तोडण्याचा प्रयत्न केला.
चोरांच्या हाती लागले अर्धेच झुंबर
चोरांच्या कृत्यामुळे इलग यांना वेदना झाल्या मात्र त्यांनी हात कानाजवळ नेल्याने चोरांच्या हाती झुंबरचा अर्धाच भाग लागला व त्यांचा कान तुटण्यापासून वाचला. चोरांनी मात्र अर्धे झुंबर घेऊन दुचाकीवरुन पोबारा केला.
भरदिवसा लुटमार!
भर दिवसा लुटमारीचा प्रकार झाल्याने पोलिस सतर्क झाले. मुकूंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हा गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांनी धाव घेत पाहणी केली याचदरम्यान दुकानाच्या बाजुला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली हाेती.
पुढच्या सीसीटीव्हीने लागला सुगावा
चोरांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पुढे मुकूंदवाडी गावातही एका सीसीटीव्ही फुटेजच्या पाहणीत पोलिसांना दिसली. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांमार्फत शोध सुरू केला. राजनगरमध्ये यापैकी एकजण उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंमलदार नरसिंग पवार, बाळासाहेब कांबळे, सुखदेव जाधव, मनोहर गिते, संतोष भानुसे, गणेश वाघ, शाम आढे यांनी धाव घेत दोघांना सात वाजता ताब्यात घेत झु्ंबर जप्त केले.
लुटीपूर्वी विचारले सीसीटीव्हीबाबत चौकशी
सिगारेट घ्यायला उतरल्यानंतर त्यांनी इलग व आसपासच्या दोन तरुणांना येथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, अशी विचारणा केली. कॅमेरे नाही, असे कळताच मग त्यांनी पुढचे पाऊल उचलले.
पंधरा दिवसांपूर्वी लग्न, दीड महिण्यापूर्वी आईचा खून
आश्चर्यकारक बाब म्हणजे, पंधरा दिवसांपुर्वीच सतिष चा विवाह झाला आहे. ते कारण सांगून तो पोलिसांसमोर सोडून देण्यासाठी पाया पडत होता. दिड महिन्यापुर्वी त्याच्याच बहिणीने प्रियकराच्या मदतीने त्यांच्या आईची हत्या केली अशी बाबही पोलिसांकडून सांगण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.