आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केव्हीचे अंडरग्राउंड केबल:अंडरग्राउंड केबलचे काम सुरू; वाहतुकीची कोंडी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंपा चौक ते शहागंज जलकुंभापर्यंत ११ केव्हीचे अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सुरू आहे. केबल टाकल्यामुळे रस्त्यावरील खांब व लोंबकळणाऱ्या केबल कमी होतील तसेच खांबावरील विजेच्या तारांच्या जाळ्यांची मोठी अडचण दूर होणार आहे. मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे एकीकडे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. मोठी रहदारी असणाऱ्या या रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे.

चंपा चौक ते चेलीपुरापर्यंत रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झालेला आहे. तो दुरुस्तही करण्यात आलेला नाही. उलट अंडरग्राउंड केबलचे काम सुरू केले असल्याने आहे तो रस्ता आणखी खराब झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पूर्णपणे बुजवण्यात आले नाहीत. त्यामुळे दिवसभर वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...