आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:विहामांडवा शिवारातील कोरडे वस्तीवरील दुर्दैवी घटना; पोहणे शिकण्यासाठी गेलेली ४ मुले, काकाचा बुडून मृत्यू

विहामांडवा (ता.पैठण)3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आठ वर्षांच्या मुलीची मदतीची हाक

विहामांडवा येथे शेततळ्यात मुलांना पोहणे शिकवण्यासाठी गेलेल्या काका आणि ४ भावंडे अशा ५ जणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी कोरडे वस्तीवर घडली. 

शाळेला सुट्या आणि कोरोनामुळे संचारबंदी असल्याने कोरडे कुटंुबीयातील लक्ष्मण कोरडे (३०) हे त्यांच्याच शेतातील शेततळ्यात दुपारी २ वाजेदरम्यान आपला मुलगा तसेच पुतण्यांना पोहणे शिकवण्यासाठी घेऊन गेले होेते. त्या वेळी काही मुले गटांगळ्या खात असल्याचे दिसताच लक्ष्मण हे त्यांना वाचवण्यासाठी धावले, मात्र मुलासह तेही बुडून मृत्यू पावले. यामध्ये वैभव रामनाथ कोरडे (११), सार्थक लक्ष्मण कोरडे (६), अलंकार रामनाथ कोरडे (९), समर्थ ज्ञानेश्वर कोरडे (९), लक्ष्मण निवृत्ती कोरडे (३०) यांचा समावेश आहे. या सर्वांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी घुगे यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबद्दल  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आठ वर्षांच्या मुलीची मदतीची हाक

लक्ष्मण कोरडे यांची आठ वर्षांची मुलगी वैष्णवी ही तळ्यावर बसलेली होती. वडिलांसह आपली भावंडे बुडू लागल्याचे तिच्या लक्षात येताच तिने जिवाच्या आकांताने आपले काका रामनाथ यांना मदतीसाठी हाका मारल्या, परंतु ते येेईपर्यंत सर्व काही संपले होते. घरातील सर्वच मुले गेल्याने आमचे घरच संपले, असे हताशोद्गार रामनाथ कोरडे यांनी काढले.

बातम्या आणखी आहेत...