आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग्ज कॉलेजच्या संशोधनात समोर आला निष्कर्ष:दु:खी राहणाऱ्या लोकांना लठ्ठपणा येतो; ते आनंदी राहणाऱ्यांपेक्षा 10 वर्षे कमी जगतात

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक आजार जगभरातील सुमारे एक अब्ज लोकांकडून त्यांचा आजार, शांतता आणि विश्रांती हिरावून नेत आहे. यामुळे खूप जास्त लोकांचे तारुण्य आणि आयुष्यातील वर्षे मानसिक आजारामुळे कमी होत आहेत. पॅरिसमध्ये युरोपीय काँग्रेस आणि सायकेट्रीमध्ये सादर केलेल्या नव्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. दु:खी राहिल्याने लवकर लठ्ठपणा येतो. असे राहणारे लोक आनंदी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत १० वर्षे कमी जगतात. लंडनच्या किंग्ज कॉलेजचे संशोधक ज्युलियन मुट्झ यांनी सांगितले की, या अभ्यासाठी यूके बायोबँकेतील एक लाखापेक्षा जास्त व्यक्तींचे रक्तनमुने वापरून १६८ वेगवेगळ्या मेटाबोलाइटचा अभ्यास केला. त्यात कोलेस्टेरॉल, फॅटी अॅसिडसह अन्य घटकांमार्फत व्यक्तीचे कमकुवत आरोग्याच्या संकेताची माहिती मिळवली.

मानसिक आजारामुळे महिलांचे वय ७ वर्षांपर्यंत कमी होते लँसेटने ७४ लाख लोकांवर अभ्यास केला होता. त्यानुसार, यामध्ये समाेर आले की, पुरुष मानसिकदृष्ट्या आजारी असतील तर ते सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत १० वर्षांपर्यंत कमी जगतात. महिलांचे वय या स्थितीत ७ वर्षांपर्यंत कमी होते.