आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र निदर्शने:पथविक्रेत्यांवर होणारा अन्याय थांबवण्याची युनियनची मागणी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या महापालिका प्रशासनाकडून जी-२० परिषदेच्या नावाखाली विविध कामे केली जात आहेत. परंतु या परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना हातगाड्या दिसू नयेत यासाठी गरिबांच्या पोटावर लाथ मारली जात आहे. यामुळे प्रशासनाने जी - २० परिषदेच्या नावाखाली चाललेला देखावा बंद करावा, अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने शुक्रवारी (३ फेब्रुवारी) करण्यात आली. संघटनेच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. अतिक्रमण पथक कायद्याचे उल्लंघन करून पथविक्रेत्यांवर हल्ले करीत आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

एसबीओए शाळेसमोर पथविक्रेत्यांवर हल्ला करणारे मनपा अधिकारी, कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करा, चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करा, पथविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायदाअंतर्गत पथविक्रेत्यांवर कारवाई करण्यास मज्जाव करण्यात यावा, पथविक्रेत्यांवर झालेल्या हल्ल्याची पोलिस तक्रार करा, पथविक्रेत्यांना कर्जासाठी कागदपत्रे देण्यासाठी त्रास देणे बंद करा आदी मागण्या केल्या. संघटनेचे अध्यक्ष अॅड. अभय टाकसाळ, शेख इसाक, अभिषेक बनकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...