आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखाची मदत:केंद्रीय मंत्री आठवलेंची आव्हाड कुटुंबीयांना 1 लाखाची मदत ; तरुणाच्या कुटुंबीयांची घेतली भेट

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच मृत मनोज आव्हाड या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना पक्षातर्फे एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तसेच मृताच्या पत्नीला समाज कल्याणमध्ये नोकरी देण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम यांच्या हस्ते पीडित कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मिलिंद शेळके, किशोर थोरात, दिलीप पाडमुख, कमलेश चांदणे, गोरखनाथ तुपे, भास्कर डवंडे, दादाराव राऊत, प्रकाश गायकवाड, दिनेश चांदणे यांची उपस्थिती होती. गेल्या महिन्यात आव्हाड याचा क्रूर पद्धतीने खून झाला होता. त्यामुळे पूर्ण शहर हादरून गेले होते. सामाजिक संघटनांनी या प्रकरणी आक्रमक होत आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपींना अटक केले. त्यानंतर आठवले त्यांनी संवेदनशीलता दाखवत आव्हाड कुटुबियांना आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली होती.

बातम्या आणखी आहेत...