आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:केंद्रीय मंत्री डॉ. कराडांच्या हस्ते शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा गौरव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हडको येथे आयोजित कार्यक्रमात संस्थेचे शहीद माजी कॅडेट फ्लाइंग ऑफिसर तानाजी पायगुडे, कॅप्टन अविनाश यशवंत सोमवंशी यांच्या कुटुंबीयांचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी सैन्यात विविध पदांवर अधिकारी असलेले संस्थेचे शंभराहून अधिक माजी कॅडेट उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका मेजर सय्यदा फिरासत, माजी संचालक कर्नल अमित दळवी, प्रकाश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेचा प्रतिवर्षी २१ डिसेंबर रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यंदा प्रशासनिक कारणास्तव १७ डिसेंबरला समारंभाचे आयोजन केले होते. भारतीय सैन्याला अधिकारी पुरवणारी राज्य शासनाची शिक्षण संस्था ही देशात क्रमांक दोनवर असून आतापर्यंत संस्थेने ६५० अधिकारी भारतीय सैन्य दलाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. या वेळी संस्थेचे माजी संचालक कर्नल दिलीप परब, गीता परब, लेफ्टनंट कर्नल समीर राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती. कॅडेट दिनानिमित्त देशभरातील संस्थेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आयोजित करतात. देशात अग्रेसर असलेल्या संस्थेच्या वाढीसाठी व विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या वेळी डाॅ. कराड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...