आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:रक्तदानाचे अनोखे अभियान; दात्यांचे जाळे निर्माण करून वाचवले 29 प्राण

नांदेड (शरद काटकर )3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे येथील तृतीयपंथीयही या ग्रुपशी जोडले गेले.

काेराेनाच्या काळात राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा होता. ही अडचण लक्षात घेऊन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी अनाेखी शक्कल लढवत राज्यभरात रक्तदानास इच्छुक असलेल्या व्यक्तींचे मोठे जाळे निर्माण केले. इंटरनेटवर एका फॉर्मची निर्मिती करून सर्वांच्या नोंदी ठेवल्या अन् गरज असेल तेथे तत्काळ मदत पोहोचवली. राज्यात नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, पुणे, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती, आदी ठिकाणी रक्तदानासाठी तातडीने स्वयंसेवक पाठवल्याने २९ जणांचा जीव वाचवण्यात यश आले.

एनएसएसच्या स्वयंसेवकांनी एका शहरापुरते मर्यादित राहण्यापेक्षा राज्यातून रक्तदानास इच्छुक असणाऱ्यांची मोठी यादी तयार केली.

रक्तगटांची असलेली नोंदणी
ओ निगेटिव्ह ०६
बी निगेटिव्ह ६१
बी पॉझिटिव्ह ६१
ओ पॉझिटिव्ह ६९
ए पॉझिटिव्ह ०८
एबी पॉझिटिव्ह ६६

असा चालतो हा उपक्रम
स्वयंसेवक अमोल सरोदे म्हणाला की, या फॉर्मवर दात्याची सर्व माहिती जसे वय, वजन, पूर्ण नाव, पत्ता, रक्तगट, पूर्वीचे आजार आदी सर्व माहिती आहे. सध्या ३०१ लोकांची यादी तयार आहे. विशेष म्हणजे ज्या शहरातील दात्यांनी नावे इंटरनेटच्या फॉर्मद्वारे नोंदवली तेथील शासकीय रुग्णालयांमध्ये नांदेडच्या एनएसएसच्या स्वयंसेवकांचे नंबर दिले आहेत. रक्त हवे असल्यास त्या शहरातून स्वयंसेवकांना फोन जातो आणि मदत पोहोचवली जाते.

तृतीयपंथीयांचाही सहभाग : या अभियानामुळे नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, शिर्डी, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणच्या २९ जणांचे जीव वाचले. पुणे येथील तृतीयपंथीयही या ग्रुपशी जोडले गेले.

नांदेड येथे थॅलेसेमियाच्या ८ वर्षीय रुग्णाला ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. त्याच्या पालकांनी एनएसएस टीमशी संपर्क साधला. स्वयंसेवक अमोल सरोदे यांनी महाविद्यालयाच्या ग्रुपमध्ये संदेश पाठवला. याला एका तरुणाने प्रतिसाद दिला. परंतु कोरोनामुळे या तरुणाच्या घरचे त्याला रक्तदान करण्यास परवानगी देत नव्हते. त्याने घरच्यांच्या नकळत खासगी कामाचे निमित्त करत विष्णुपुरी येथील जिल्हा रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.

बातम्या आणखी आहेत...