आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेच्या आवारात पुस्तके व शालेय साहित्य विक्री करून लूट केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. चौकशीत या आरोपात तथ्य आढळून आल्यामुळे शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी चिकलठाणा एमआयडीसीतील युनिव्हर्सल हायस्कूलचे नाव काळ्या यादी टाकले. पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह विभागीय तक्रार निवारण समितीकडे याबाबत तक्रार केली होती. १० जानेवारी २०२२ रोजी झालेल्या सुनावणीतील निर्णयानुसार, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन विविध प्रकारची माहिती सादर करण्याचे कळवले होते. मात्र, शाळेकडून प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारदार पालकांनी शाळेचा लोगो असलेली स्कूल बॅग, वह्या आदी साहित्य शिक्षण विभागाला दाखवले. तसेच हे साहित्य शाळेमार्फत पुरवण्यात येत असल्याचे शाळेच्या शुल्क रचनेच्या विवरणावरूनही दिसून आले. शासन निर्णय ११ जून २००४ नुसार शैक्षणिक साहित्य, शाळेच्या भांडारातून किंवा ठरवून दिलेल्या दुकानातून खरेदीची सक्ती करता येत नाही. समितीने केलेल्या या तक्रारीनुसार चौकशीत शाळा दोषी आढळली. त्यामुळे काळ्या यादीत टाकण्याची परवानगी शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितली हाेती. उपसंचालक अनिल साबळे यांनी १० जून रोजी ती परवानगी दिली. मनपा सीबीएससी शाळेत ज्युनियर, सीनियर केजीचे वर्ग; २०० जागांसाठी ३९० अर्ज सामान्य, गरीब कुटुंबातील मुलांना सीबीएसई पद्धतीचे शिक्षण मिळावे यासाठी महापालिकेने तीन नवीन शाळांमध्ये ज्युनियर, सीनियर केजीचे शिक्षण देण्याचे ठरवले आहे. त्यात २०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यासाठी सोमवारी ३९० अर्जांची विक्री झाली. आजपासून अर्ज दाखल करता येतील. प्रियदर्शिनी मयूरबन कॉलनी, एन ७ सिडको, चेलीपुरा येथे सीबीएसई शाळा असेल. समितीमार्फत अर्जांची छाननी करुन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीअंतर्गत शाळा दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही मनपाच्या काही शाळांमध्ये कासवगतीने दुरुस्ती सुरू असल्याने वर्गखोल्यांची परिस्थिती वाईट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.