आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया १० सप्टेंबरला स्पॉट अॅडमिशन; फिजिक्स, केमिस्ट्री, आयटी फुल्ल; पदव्युत्तरचे ७०% प्रवेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागात सध्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विद्यापीठाची केंद्रीय पद्धतीने तीन टप्प्यात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात शनिवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया पार पडली. १ हजार जागेसाठी २ हजार १३३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. यात रात्री ८:३० वाजेपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील ७० टक्के जागा भरल्या असून ७०० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. विद्यार्थी संख्या अधिक असल्याने उशिरापर्यंत प्रवेश सुरू होते. या दुसऱ्या टप्प्यात फिजिक्स, केमिस्ट्री अॅनालिटिकल केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, आयटीसाठी १०० टक्के प्रवेश पूर्ण झाल्याचे प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गायकवाड यांनी सांगितले.

आता ५ सप्टेंबर रोजी आंतरविद्याशाखा, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सामाजिकशास्त्रातील जागा भरण्यात येतील, तर रिक्त जागांसाठी १० सप्टेंबर राेजी स्पाॅट अॅडमिशन हाेईल.विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी ही प्रक्रिया आयोजित केली हाेती. सकाळी ८:३० वाजेपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता ५ सप्टेंबर रोजी प्रवेश प्रक्रियेतील तिसरा टप्पा असेल, तर उर्वरित जागांसाठी १० सप्टेंबर रोजी स्पॉट अॅडमिशन प्रक्रिया राबवण्यात येईल. यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली नाही अथवा काही अडचणी आल्या असतील तर अशा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यांच्यासाठी प्रवेशाची ऑनलाइन लिंकदेखील ओपन करून देण्यात येणार असल्याचे डाॅ. गायकवाड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...