आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ अधिसभा निवडणूक:'उत्कर्ष’ आणि ‘मंच’ मध्येच फाइट; अधिसभेच्या 31 जागासाठी 89 जण उमेदवार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या 25, विद्यापरिषदेच्या 6 जागांसाठी मंगळवारी (13 डिसेंबर) मतमोजणी होत आहे. कॉलेज प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्या परिषदेच्या 6 मतदारसंघांसाठी 89 उमेदवार आहेत. अधिसभेत 70 तर विद्या परिषदेसाठी 19 जण रिंगणात आहे.

उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. चार पॅनल असले तरी मैदानात प्रमुख दोनच पॅनलमध्ये लढत होणार आहे. अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंच आणि राष्ट्रवादी प्रणित उत्कर्षचा त्यात समावेश आहे.

पदवीधर अधिसभेत यापूर्वीच 10 उमेदवार निवडूण आले आहेत. उत्कर्ष- 8, उद्धव सेना आणि मंचला त्यातील प्रत्येकी एक जागा मिळाली. आता 29 अधिसभेपैकी रमेश आडस्कर यांच्या पत्नी अर्चना चव्हाण आणि अनुसूचित जमातीतून नितीन जाधव हे संस्थाचालक मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेत. प्राचार्यांतील महिला उमेदवाराची जागा रिक्त आहे.

डॉ. शिवदास शिरसाट हे बिनविरोध विजयी झालेत. त्यामुळे 25 जागांसाठी 70 जणांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. उत्कर्ष आणि मंचला टक्कर देण्यासाठी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांचे परिवर्तन पॅनल आणि डॉ. शंकर अंभोरे यांच्या स्वाभिमानी मुप्टानेही उमेदवार दिले आहेत. महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या खुल्या 5 जागांवर रंगतदार लढती दिसून येतील. राखीवच्या 5 जागांवर उत्कर्ष नेहमी प्रमाणे वर्चस्व राखण्याची शक्यता आहे. बामुक्टो आणि बामुक्टा या दोन प्रबळ प्राध्यापक संघटनांचे यंदा उत्कर्षला समर्थन आहे. बामुक्टोला विक्रम खिल्लारे आणि संजय कांबळे यांंच्या रूपाने दोन जागा दिल्या आहेत.

संस्थाचालक मतदारसंघाच्या 6 पैकी 2 जागा बिनविरोध आल्या आहेत. उर्वरित 4 पैकी संजय निंबाळकर आणि बसवराज मंगरूळे हे विजयाच्या जवळ आहेत. राहिलेल्या 2 जागांसाठी गोविंद देशमुख, डॉ. मेहर दत्ता पाथ्रीकर, अश्लेष मोरे, किशोर हंबर्डे, राहुल म्हस्के आणि विनायक चोथे यांच्यात लढत होईल. विद्यापीठ प्राध्यापक गटाच्या 3 जागांसाठी 9 जण रिंगणात आहेत. खुल्या जागेसाठी डॉ. सतीश दांडगे, डॉ. संजय साळुंखे यांच्यात लढत होईल. विद्या परिषदेत एकूण 8 निर्वाचित जागांपैकी 2 रिक्त राहिल्या आहेत. 6 जागांसाठी 19 जण रिंगणात आहेत.

बातम्या आणखी आहेत...