आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक विभागांचा समावेश:विद्यापीठ, कॉलेजच्या दिवाळी सुट्या उद्या संपणार; 4 नोव्हेंबरपासून तासिका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय कामाला आता सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या सात दिवसांच्या सुट्या होत्या. त्या आता संपल्या आहेत. विद्यापीठातील सर्व प्रशासकीय विभागांचे नियमित कामकाज सुरू झाले आहे. विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, संलग्नित कॉलेज, उस्मानाबाद उपकेंद्रातील शैक्षणिक विभागांच्या सुट्याही ३ नोव्हेंबरला संपणार आहेत. ४ नोव्हेंबरपासून नियमित तासिकांना सुरुवात होणार आहे.

विद्यापीठात सध्या पदवीधर अधिसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. २ आणि ३ नोव्हेंबरला उर्वरित मतदारसंघाच्या मतदार यादीवर अंतिम आक्षेपांची सुनावणी हाेणार आहे. त्यासाठी विद्यापीठात कामाची लगबग सुरू आहे. त्याशिवाय सर्व प्रशासकीय विभाग, राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन येथील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे कामकाजही नेहमीप्रमाणे सुरू झाले आहे. विद्यार्थी आता कुठल्याही कामासाठी परीक्षा भवनात येऊ शकतात.

उस्मानाबाद उपकेंद्रातील १० शैक्षणिक विभाग आणि उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद या ४ जिल्ह्यांतील ४६४ संलग्नित कॉलेजांना १५ दिवसांच्या दिवाळी सुट्या होत्या. ३ नोव्हेंबर हा सुटीचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील ४५ शैक्षणिक विभाग आणि उस्मानाबाद उपकेंद्रातील १० शैक्षणिक विभागांच्या तासिका ४ नोव्हेंबरला सुरू होणार आहेत. कॉलेजच्या तासिकाही ४ नोव्हेंबरपासूनच सुरू होतील.

स्टेट बोर्डाच्या इंग्रजी उघडल्या, मराठी शाळा ८ पर्यंत बंदच
जिल्हा परिषद, मनपा आणि खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांना २२ दिवसांच्या सुट्या होत्या. या शाळांना आणखी ७ दिवसांच्या सुट्या आहेत. ८ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे. त्यामुळे ९ नोव्हेंबरला शाळा सुरू होऊन नियमित तासिकाही सुरू होतील. इंग्रजी स्टेट बोर्ड माध्यमाच्या शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या आहेत. कारण, इंग्रजी व सीबीएसई शाळांना नाताळात सात ते दहा दिवसांच्या सुट्या असतात. त्यामुळे त्यांनी दिवाळीत सात दिवसांच्या सुट्या कमी घेतल्या आहेत. १ नोव्हेंबरपासून या शाळांचे वर्ग सुरू झाल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...